तुळजापूर (प्रतिनिधी) - श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर अंतर्गत मंदिर परिसरातील नुतनीकरण विविध विकासात्मक कामे पुरातत्व विभागाकडून करावयाचा कामांना विधानसभा निवडणुक संपताच कामांना प्रारंभ झाला आहे.
सध्या जुन्या पुरातन वास्तुतील दगडी कामांमधील प्राचीन दगडांना नंबर टाकणे आरंभ झाला आहे. या अंतर्गत पिंपळ पार जिथे सिमोल्लंघना नंतर देवी मुर्ती पालखीत ठेवली जाते. त्या पिंपळ झाडाखालील पारांचा दगडीना नंबर टाकणे काम चालु केले असुन हेच काढलेले दगड पुन्हा त्याच ठिकाणी बसवले जाणार असल्याने जुन्या घडीव दगडीवर नंबर टाकले गेले आहेत.
तसेच मंदीर परिसरातील नव्याने केलेले बांधकाम काढणे, भुयारी मार्ग, यज्ञ मंडप, सभामंडप व भवानीशंकर मंदिर जतन दुरुस्ती (भाग-1) 11,36,35,272 रुपये स्मारक परिसरातील कार्यालयीन इमारत, प्रशासकीय इमारत, पोलीस चौकी, खुला प्रेक्षामंच, इत्यादी नव्याने केलेले बांधकाम काढणे, गोमुख तीर्थ दत्त मंदिर, मातंगी मंदिर, कल्लोळ तीर्थ, निंबाळकर व्दार, मार्तंड ऋषी मंदिर, टोळ भैरव मंदिर, दीपमाळ,शिवाजी महाव्दार व ओव्ह-या, खंडोबा मंदिर, यमाई मंदिर, जतन व दुरुस्ती (भाग-2) 10,55, 82, 768 स्मारकाचा मंदिर व मंदिर परिसर विकास आराखड्याअंतर्गत स्मारक परिसरातील तुकोजी बुआ मठाकडील दगडी संरक्षण भिंत, दगडी फरशी, आवश्यकतेनुसार दगडी पाय-या, महावस्त्र अर्पण केंद्र जतन दुरुस्ती (भाग-3) 9,57,27,135 रुपये स्मारकपरिसरातील तुकोजी बुवा मठावरील ओव्हऱ्या, आराध खोल्यावरील ओव्हऱ्या, आराध खोली. दगडी फरशी जतन दुरुस्ती (भाग-4) 15,10,59,387 रुपये स्मारकाचा मंदिर व मंदिर परिसर विकास आराखड्याअंतर्गत स्मारक परिसरातील मुख्यप्रवेशव्दार तसेच जिजामाता महाव्दार जतन दुरुस्ती (भाग-5) 7,30,74,970 रुपये स्मारक परिसरातील लिफ्ट तसेच रॅम्प तयार करणे जतन दुरुस्ती (भाग-6) 4,20,68,962 रुपये सदरील कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असुन यासाठी 58.12.कोटीचे विकास कामे केले जाणार आहेत.