तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर विधानसभा मतदार संघात नभूतो न भविष्यतो अशी चुरस निर्माण झाली आहे. मराठा समाजाचे मते आपल्या पदरात पडावे यासाठी तुळजापूर विधानसभा मतदार संघातील पाच ते सहा उमेदवारांनी विविध सोर्स माध्यमातून जोरदार फिल्डींग लावली आहे. जरांगे पाटील कुणाला पाठींबा देणार याकडे सर्वच पक्षाच्या नेते मंडळीचे लक्ष लागले आहे.
तुळजापूर विधानसभा मतदार संघात प्रामुख्याने ग्रामीण भागात मराठा आरक्षण आंदोलन धन ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होती. त्याचा लाभ महाविकास आघाडीचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुरेपुर मिळुन त्यांना तालुक्यातुन 55 हजार मताधिक्य मिळुन झाला. मात्र लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत याचे काय परिणाम होणार याची उत्सुकता लागली आहे.
तुळजापूर विधानसभा मतदार संघातुन मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांच्या पाठींब्या वरुन लढण्यासाठी मोठ्या संखेने उमेदवारांनी मागणी केली होती. माञ न लढण्याचा निर्णय घेतल्याने या मंडळींनी मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांचा आदेश मानत उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीने सुटकेचा श्वास घेतला. नंतर तालुक्यातील दोन उमेदवारांनी जरांगे पाटील म्हटल्याप्रमाणे बाँड लिहुन दिला असुन तो सोशल मिडीयावर प्रचंड हायरल झाला आहे. जसजसे मतदान दिवस जवळ येत आहे तसतसे मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांचा पाठींबा मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न उमेदवारांकडून केले जात आहेत. मराठा नेता मनोज जरांगे पाटील कुणाला पाठींबा देणार यावर विजयाचे गणित अवलंबून असल्याचे राजकिय जाणकार सांगत असल्याने कधी नव्हे ते मराठा समाजांचा मताला महत्त्व प्राप्त झाले आहे.