धाराशिव (प्रतिनिधी)- आविष्कार - 2024-25 इंटर यूनिवर्सिटी झोनल लेवल प्रकल्प सादरीकरण श्रीगणेश रामचंद्र क. कॉलेज ऑफ फार्मसी, जिल्हा परभणी येथे आयोजित करण्यात आले होते. तेरणा महाविद्यालयात मागील पाच वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नवीनपूर्ण संकल्पनांना वाव दिला जात असून विद्यार्थ्यांनी परभणी जिल्हा येथे अविष्कार- 2024-25 या उपक्रमांतर्गत 12 नवीन प्रकल्प सादर केले.
यामध्ये तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन विद्यार्थी उत्कर्ष म्हात्रे ( कॅटेगरी - ह्यूमैनिटीज, लैंग्वेज फाइन आर्ट ) व विश्वजीत गवळी (कॅटेगरी - इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी ) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला असून या विद्यार्थ्यांची पुढील यूनिवर्सिटी लेवल सादरीकरणासाठी निवड झाली आहे. महाविद्यालयात करत असलेला रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभाग या चार प्रोजेक्टसाठी महाविद्यालय सर्वतोपरी प्रयत्न करून त्या प्रोजेक्टची रूपांतर स्टार्टअप मध्ये करण्याचा प्रयत्न करत असून गतवर्षी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत आयोजित महाराष्ट्र इनोव्हेशन चॅलेंज मध्येही प्रत्येकी एक लाखाप्रमाणे बीज भांडवल मिळाले आहे , त्यामुळे नवीन कल्पक कल्पनांचे रूपांतर स्टार्टअप मध्ये रूपांतर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे व स्वतःचे स्टार्टअप लवकर सुरू होईल असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी केले.
या महाविद्यालयात मागील काळातही मानवी रोबोट इलेक्ट्रिकल कार इलेक्ट्रिकल स्कूटर स्टुडन्ट अटेंडन्स मॉनिटरिंग सिस्टीम युजिंग आर एफ आय डी टेक्नॉलॉजी व लोकेशन बेस्ड वर्क ट्रॅक प्रणाली अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट तयार केले आहेत.अविष्कार 2024-25 चे समन्वयक डॉ. सुशीलकुमार होळंबे, सह समन्वयक प्रा.रवींद्र गुरव, प्रा.डी. बी. ठाकूर, प्रा.डी. बी. भक्ते, प्रा.बालाजी चव्हाण, प्रा.ए.के.पिंपळे, प्रा.व्ही. एस. बोंदर, प्रा.आर. बी. ननवरे या सर्वांनी विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्था व्यवस्थापन व महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.