मुरुम (प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे एनसीसी व एनएसएस, एचडीएफसी बँक, श्रीकृष्ण रक्तपेढी, रोटरी क्लब उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय समारोपात अस्वले सरांनी रक्तदान केल्यामुळे हृदयरोग , कँसर , मधुमेह , रक्तदाब ,यासारखे रोग होण्याचा धोका कमी होतो . रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे या उक्ती प्रमाणे प्रत्येक व्यक्तिने रक्तदान करून एखाद्या गरजवंतास जीवदान देऊन त्याचे प्राण वाचवावे . उमरगा शहर हे महामार्गावर असल्यामुळे अनेक अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे अनेक रक्तपेढया मध्ये रक्त कमी पडत असते अशावेळी श्रीकृष्ण रक्तपेढी गरजुंना मदत करत असते तसेच रोटरी क्लब ,भारतातील अग्रगण्य अशी एचएफडीसी बँक नेहमी सामाजिक कार्य करत असते यासाठी अनेक सामाजिकसंस्था , महाविद्यालयाने असे कार्यक्रम घेऊन व्यक्तिचे प्राण वाचवावे असे आव्हान त्यांनी केले. या शिबिरामध्ये एकूण 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले . कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एचडीएफसी बँकेचे मॅनेजर श्री आशिष बिराजदार , डॉ धनंजय मेनकुदळे, प्रा आर एम जोशी, विजय केवडकर उपस्थित होते.
प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले, डॉ भरत शेळके डॉ अशोक पदमपल्ले, डॉ विनोद देवरकर, प्रा गुंडाबापू मोरे , प्रा शैलेश महामुनी बँकेचे , रक्तपेढीचे सर्व कर्मचारी महाविद्यालयीन प्राध्यापक, प्राध्यापिका, कर्मचारी ,मोठ्या संख्येने एनसीसी कॅडेट्स व एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. अनिल देशमुख, केले तर कॅप्टन डॉ. ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
