नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील राजगुरु श्री ष.ब्र.शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी पूण्स्मरणोत्सवानिमीत्त सोमावार दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी नळदुर्ग शहरात श्रीमद रंभापूरी जगदगुरु यांचे आडडपालखी उत्सव व सहस्त्र सुहासीनींचा कुंभ मिरवणूक सोहळा मोठया उत्साहात पार पडला या सोहळयामध्ये सुमारे दिड हजार सुहासिनीं कुंभ घेवून सहभागी झाल्या होत्या. 

दरम्यान या मिरवणुकीत सर्वांचे आकर्षण बनले वीर भद्रेश्वर यांच्या वेशभूषेतील वीरराशी यांचे.नळदुर्ग येथे राजगुरु श्री ष.ब्र. शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पूण्यतीथी निमीत्त दि. सात नोव्हेंबर 2024 ते दि. 18 नोव्हेंबर पर्यंत येथील शिवलिंगेश्वर हिरेमठात मठाचे मधाधिपती श्री ष.ब्र. बसवराज शिवाचार्य महाराच यांच्या मार्गदर्शनानुसार विविध धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी धार्मीक प्रवचन, विविध समाजातील जेष्ठांचा आणि प्रमुखांचा सत्कार समारंभ, पत्रकारांचा सत्कार समारंभ, गुरुमाता यांचे आमृतमहोत्सवा निमीत्त तुलाभार कार्यक्रम, श्री ष.ब्र. बसवराज शिवाचार्य महाराज यांचा 50 वाढदिवस साजरा करण्यात आला तर जगदगुरु रेणुकाचार्य यांचा पंचधातु मर्ती प्राणप्रतिष्ठापणा ही करण्यात आली. त्याच बरोबर शेवटच्या दिवशी श्रीमद रंभापूरी जगदगुरु यांचे नळदुर्ग शहरात आगमन झाल्या नंतर श्हरातून त्यांचा आडड पालखी मिरवणुक व सहस्त्र सुहासिनींचा कुंभ मिरवणु सोहळा ही काढण्यात आला. या कुंभ मिरवणुकीत शहरातील सुमारे दिड हजार सुहासिनी सहभागी झाल्या होत्या. नळदुर्गच्या इतिहासात पहिल्यांदाच असा नेत्रदिपक कुंभ मिरवणुक सोहळा साजरा झाला. दरम्यान या मिरवणुकीत विविध वादय, धनगरी ढोल, त्याच बरोबर विरभद्रेश्वर यांचे वेशभुषेतील वीरराशी यांचे विविध नृत्य सादरीकरण हे नागरीकांचे लक्ष वेधुन घेत होते. या पालखी सोहळयात हजारो भक्तांनी श्रीमद रंभापूरी जगदगुरु यांचे दर्शनाचा लाभ घेतला. सुमारे तीन तास चाललेल्या या मिरवणुकीत स्वयंसेवकांनी मोठया प्रमाणात व्यवस्था लावल्यामुळे उन्हाच्या चटक्यांमध्ये ही आपल्या डोक्यावर सुहासिनी महीला कुंभ घेवून चालत होत्या. दरम्यान या सोहळयामध्ये परिसरातील त्याच बरोबर इतर राज्यातून आलेले भाविक भक्त आणि विविध मठाचे मठाधिपती सहभागी झाले होते. हा पालखी सोहळा बोरी नदीच्या काठावरुन विठठल मंदीरा पासून सुरु करण्यात आला. धर्मवीर संभाजी चौक, चावडी चौक, बसवेश्वर चौक, भवानी चौक मार्गे शास्त्री चौकात आल्या नंतर शिवलिंगेश्वर मठात मिरवणुकीचा सांगता समारंभ करण्यात आला. त्यानंतर धर्म सभा आयोजित करण्यात आली होती. धर्मसभा झाल्यानंतर सर्वांना श्री आंबाबाई मंदीराच्या सभागृहामध्ये महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मिरवणुक मार्गावर राजमाता अहिल्यादेवी होळकर चौका पासून ते चावडी चौका पर्यंतचा शहरात जाणारा रस्ता पूर्ण पणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान जगदगुरुंचे आगमन होणार म्हणून मिरवणुक मार्गावर रात्री पासून सडा मारुन महीला मंडळी यांनी रांगोळी काढून ठेवली होती. तर ठिकठिकाणी रस्त्यावर फुलांची उधळण ही करण्यात आली होती. मिरवणुकीत जगदगुरु यांच्या पालखीवर भाविकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली. दरम्यान या सोहळयामध्ये शहरातील सर्वच समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते नागरीक, तरुण आणि महीला मंडळी सहभागी झाल्या होत्या. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मठाधिपती श्री ष.ब्र. बसवराज शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रेय कोरे, मल्लीनाथ माळगे, ज्योती बचाटे, महेश कोप्पा, बंडू कसेकर, माजी नगरसेवक बसवराज धरणे, मल्लू बाळुरकर, शिवाजी मुळे, प्रकाश बेडगे यांच्या सह वीरशैव समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परीश्रम घेतले.

 
Top