तुळजापूर (प्रतिनिधी)- शिवसेना (उबाठा ) प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानसभा मतदानापूर्वी एक दिवस अगोदर मंगळवार दि. 19 नोव्हेंबर रोजी श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ येणार आहेत.
या दौऱ्यास विशेष राजकिय महत्त्व प्राप्त झाले. श्रीतुळजाभवानी दर्शन दौरा माध्यमातून शिवसेनेने हिंदुत्व मुद्दा सोडला नाही, आम्ही हिंदुत्व सोडणार नाही हे दाखवुन देण्याचा प्रयत्न असल्याने हा दौरा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला लाभदायक ठरणारा आहे. मतदानपुर्वी एकदिवस अगोदर उध्दव ठाकरे व्यस्त कालावधीत सहकुंटुंब देविचरणी येणार असल्याने शिवसेना उबाठा शिव सैनिकात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उध्दव ठाकरे सकाळी 10 वाजता मुंबई येथून खाजगी विमानाने सोलापूर येणार असुन तेथुन ते तुळजापूरला वाहनाने येणार आहेत. सकाळी 11 वाजता सोलापूर विमानतळ उतरल्यावर ते सोलापूर येथून खाजगी वाहनाने तुळजापूर मंदिरात दुपारी 12 वाजता श्रीतुळजाभवानी दर्शन, नंतर दुपारी 1 वाजता सोलापूर तेथुन मुंबईकडे रवाना असा दौरा असणार आहे.