तेर (प्रतिनिधी)- तेर व परिसराच्या विकासासाठी महायुती सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असल्याने तेर येथे विकास कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत असे प्रतिपादन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. धाराशिव तालुक्यातील तेर येथे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला त्यावेळी आ.राणाजगजितसिंह पाटील बोलत होते.
तेरणा कालव्याचा प्रश्न देखील सुटला असून शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. संत गोरोबा मंदिर विकास कामाचे नुकतेच शुभारंभ केलेले आहे, पुराणवस्तू संग्रहालयाचे काम पूर्णत्वास जात आहे. श्री त्रिविक्रम मंदिराचे गतवैभव प्राप्त करण्याचे काम अंतिम टप्यात असून सर्व कामे पूर्ण झाल्यावर हजारो भाविक यामुळे तेर येथे दर्शनासाठी येणार आहेत.
या निवडणुकीत तेरचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. त्यामुळे स्वतः उमेदवार समजून आजपासूनच घराघरात मतदारांपर्यंत जाऊन त्यांना विकासकामांची, सरकारच्या लाभाच्या योजनांची माहिती द्यावी. आपल्या तेर येथून प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यासाठी रात्रीचा दिवस करून महायुतीच्या भव्य विजयासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन यावेळी केले.यावेळी बाळासाहेब वाघ, ॲड.दत्तात्रय देवळकर ,शिवाजीराव नाईकवाडी, पद्माकर फंड, उपसरपंच श्रीमंत फंड, डॉ गुरूप्रसाद चिवटे,तेर सोसायटीचे चेअरमन सतिष कदम,भास्कर माळी, प्रविण साळुंके, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, हनुमंत कोळपे, अमोल कस्तुरे, अमित कोळपे, अर्शाद मुलांनी, सोमनाथ माळी, अजित कदम, प्रभाकर शिंपले, अतुल इंगळे,प्रजोत रसाळ, राहुल गायकवाड, सुनिल गायकवाड, अभिजित सराफ, गणेश फंड, किशोर काळे,मयूर तापडे, गुरुनाथ बंडे, संजय लोमटे, रामा कोळी,एस.बी.नाईकवाडी, नारायण भंडारे,प्रतिक नाईकवाडी, नवनाथ इंगळे, विठ्ठल कोकरे,भारत नाईकवाडी,वसंतराव नाईकवाडी,संभाजी कांबळे,विवेकानंद नाईकवाडी, संजय धाकपाडे, सरपंच दिदी काळे, लतिका पेठे,जयदेवी शिराळ व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.