तुळजापूर (प्रतिनिधी)- दि.17 रविवारी कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डि.के.शिवकुमार यांचे सकाळी तुळजापूर नगरीत आगमन झाले.काँग्रेस पक्षाचे उमेदवार धिरज कदम पाटील यांच्या निवडणुकीची सविस्तर माहिती घेऊन,पुढील नियोजनाचा आढावा घेऊन. थेट श्री तुळजाभवानी मातेची कुलाचार पुजा करण्यासाठी मंदिरात गेले.त्यांच्या सोबत माजी आमदार विश्वनाथ चाकोते उपस्थित होते. मंदिरात त्यांचे मुख्य भोपे पुजारी संकेत पाटलांनी विधिवत पुजा अर्चा केली.या वेळी जनसेवक अमोल कुतवळ,रणजीत ईंगळे,आनंद जगताप, सुदर्शन वाघमारे, गणेश ईंगळे, शशी नवले,धिरज ईंगळे, किशोर सांळुके,स्वप्नील शिंदे,आण्णा भांजी,पप्पू पवार, आण्णा गुंडगिरे आदी कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.