धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील चिखली येथील जाहीर सभेत माजीमंत्री अमित देशमुख बोलत होते.छत्रपती शिवाजी महाराजांनी आई श्री तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेऊन स्वराज्याची स्थापना केली.तेथील माती आम्ही कपाळाला लावतो हे आम्ही आमचे भाग्य समजतो.निवडणूक सर्वेक्षणात महाविकास आघाडीला 165 जागा मिळतील व आम्ही सत्तेत येणार. आपण आणखी थोडा जोर लाऊन 180 जागा निवडून येतील याची खात्री देतो.महायुती या विकृत सरकारचा नाश करायचा आहे. आपल्या मराठवाड्याचा वाली कोणीच नाही. आम्ही सोयाबीन ला सात हजार रुपये भाव देऊ,फळभाज्या, दुधाला,जास्तीत जास्त भाव देऊ,सन 2029 चे पंतप्रधान हे राहुल गांधी असतील. लातूर जिल्ह्याची आई ही धाराशिव जिल्हा आहे. तिला मी कधीच विसरणार नाही. खासदार ओमराजे निंबाळकरही अथक परीश्रम करीत आहेत.
अशोकराव जगदाळे यांना व्यासपीठावर बघुन आनंद झाला आहे. ते कुलदिप धीरज पाटलानां म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे. मी अशोक जगदाळे नां म्हणतो अशोकराव भिऊ नका मी ही तुमच्या पाठीशी आहे. हे महायुती सरकार म्हणजे जितनी हिस्सेदारी उतनी उकी टक्केवारी. सर्व पैसा समृद्धी महामार्गासाठीच खर्च केला जात आहे. अजुनही आपले मागासपण गेलेलं नाही. तुम्ही आम्हाला निवडणूक द्या आम्ही पारदर्शक सरकार देऊ.तुळजापूर विधानसभेत उद्योगाची रांग लाऊ.म्हणून राणाजी मुझको माफ करना,गलती थारेसे होगयी|असे म्हणून येत्या20तारखेला हाताच्या समोरील बटन दाबून कुलदिप धिरज कदम पाटलानां प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे अवाहन केले.या जाहीर सभेत माजी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे श्री उल्हासदादा पवार म्हणाले की सध्या देश तोडण्याचे काम हे सरकार करत आहे. शेजा-याकडे व्देशाने बघण्याचे काम चालू आहे. अमित शहा हे स्वर्गात ईदिरा गांधीवर आरोप करता.तुमची लायकी नाही. देश्यासाठी बलीदान केलेल्यावर तुम्ही आरोप करता.आम्ही संजय गांधी निराधार योजना आणली ती अद्याप बंद झाली नाही. व तुम्ही आत्ता लाडकी बहीण योजना आणून मोठी भुशारकी मारता.त्यानीही अँड. कुलदिप धिरज आप्पासाहेब कदम पाटलानां प्रचंड बहुमताने निवडणूक आणायचेच असे उद्गार काढले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अशोकभाऊ जगदाळे म्हणाले की मी या 72 गावात मागील सहामहीन्यापासून लक्ष ठेवून आहे. येथील निम्न तेरणा प्रकल्पामध्ये पाणी नाही.येथे अनेक विकास कामे राहीली आहेत. ती कुलदिप धिरज पाटील आमदार झाल्या झाल्या पुर्ण करून घेऊ.त्यामुळे त्यांना बहुमतानी निवडून आणायचेच आहे. असा निर्धार केला. या जाहीर सभेत महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार कुलदिप धिरज कदम पाटलांनी प्रस्ताव पर भाषणात विरोधक आमदार राणाजगजितसिंह पाटलांवर आरोप करत म्हंटले की 46वर्षे तुमच्या घरण्यात सत्ता देऊनही तुम्ही संपूर्ण जिल्हा भकास केलात.सहकार क्षेत्र भकास केलं.सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या या जिल्ह्यात होतात. तुम्ही शेतकरी विरोधी आहात.म्हणून मला ऐकदाच संधी देऊन प्रंचड मतानी निवडून द्यावे असे अवाहन केले.या वेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिवनराव गोरे,माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वासआप्पा शिंदे,मकरंददादा निंबाळकर, जय निंबाळकर, संजय निंबाळकर, डॉ. स्मिता शहापुरकर, नंदुभैय्या निंबाळकर, ज्योतीताई सपाटे,सतीश सोमाणी, सय्यद खलील, धनंजय राऊत, सत्तारभाई,राजाभाऊ शेरखाने, अग्निवेश शिंदे, विनोद विर,मेहेबुब पटेल, प्रशांत पाटील, शाम डोंगर, अमोल कुतवळ,अमोल जाधव सह महाविकास आघाडीचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.