तुळजापूर (प्रतिनिधी)- दिपावली सुट्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि5 पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
मंगळवार पहाटे एक वाजता चरणतिर्थ होवुन दर्शनास आरंभ झाला. आज धर्म दर्शन, अभिषेक, मुख दर्शन, सशुल्क दर्शन, स्नानासाठी रांगा लागल्या होत्या . श्रीतुळजाभवानी दर्शनानंतर भाविकांनी बाजार पेठेत खरेदी साठी गर्दी केली. भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने आज अनेक भाविकांनी कळस दर्शन घेतले. राञी मंदीर प्रांगणात छबिना काढण्यात आल्यानंतर मंदीर बंद करण्यात आले.