कळंब (प्रतिनिधी)- आमदार कैलास पाटील यांनी फक्त पन्नास खोक्याना लाथ मारली नाहीतर मंत्रीपदावर सुद्धा पाणी सोडले. याचा मी स्वतः साक्षीदार असल्याचा गौप्यस़्फोट खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनीच ही ऑफर माझ्याच फोनवरून केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. इटकूर (ता. कळंब ) येथे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारसभेत ओमराजे बोलत होते. 

यावेळी खासदार म्हणाले, ही असली बाजारबुणगे असते तर गुवाहटीला जाऊन गद्दारी केली असती. पण कैलास पाटील हा भहाद्दर आमदार होता. म्हणून निष्ठावंत राहिला. पन्नास खोक्यावर तर लाथ मारलीच पण मंत्री पदाच्या आमिषाला सुद्धा त्यांनी धुडकावून लावले. या सर्व घडामोडीचा मी स्वतः साक्षीदार आहे. माझ्याच फोनवर देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला तेव्हा त्यांनी ओमराजे तुमची अडचण आहे. पण कैलास पाटील यांना काय अडचण आहे असा सवाल केला. तेव्हा मी म्हणलं ते माझ्याबरोबरच आहेत त्यांना फोन देतो तुम्हीच बोला. फडणवीस यांनी कैलास पाटील यांना पहिल्यांदा राज्यमंत्री पद देतो म्हणाले. आमदार पाटील यांनी स्पष्ट शब्दात त्यास नकार दिला. त्यांनी मी आहे त्याठिकाणी व्यवस्थित आहे असे सांगितले. काही वेळाने पुन्हा फोन केला व फडणवीस यांनी मग कॅबेनेट मंत्री करतो म्हणाले. आमदार कैलास पाटील यांनी आपल्याला मुख्यमंत्री जरी केल तरी आपण तिकडे येणार नसल्याचे ठामपणे सांगितले. असा खुद्दार आमदार आपल्या मतदार संघाला मिळाला आहे. ज्यांनी स्वाभिमानी राहून आपल्या पक्षाशी इमान राखल व जनतेने टाकलेल्या मताशी ते प्रामाणिक राहिले. त्यामुळे मला अश्या आमदाराचा निश्चित अभिमान असल्याच खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले.


 
Top