तुळजापूर (प्रतिनिधी) - श्रीतुळजाभवानी मंदिरात शहरवासियांनी देवीदर्शन घडविण्यासाठी स्वतंत्र गेट सह अन्य सुविधा पंचेचाळीस दिवसाच्या आत उपलब्ध करुन देणार असल्याची माहीती कृषी उत्पन्न बाजारसमिती माजी सभापती विजय गंगणे यांनी दिली.

यावेळी बोलताना विजय गंगणे म्हणाले कि, महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवारांनी एकपक्षाचा व दुसरा विधानसभासाठी जाहीर नामा सादर केला आहे. हा गौडबंगाल काय आहे हे मतदारांना समजनासे झाले आहे. काँग्रेस उमेदवार हे एका विशिष्ट समाजाचे असल्याने ते श्रीतुळजाभवानी मंदिरात शहरवासियांना काय न्याय देणार? असा सवाल यावेळी केला. यांनी विधानसभेचा जाहीरनामा जाहीर केल्याने आमचा ही जाहीर नामा सोमवारी आम्ही मतदारांसमोर मांडणार आहे. काँग्रेस महिलांना तीन हजार रुपये देणार म्हणतात, यांनी आम्ही महिलांना दीड हजार देतोय याला विरोध करतात. तीन हजार रुपये देण्यासाठी यांनी काय तजवीज केली ते सांगावे असे यावेळी आवाहन केले. मतदारांनी मतदार संघाची संपुर्ण माहिती असणाऱ्या पात्र उमेदवारास मतदान करणे गरजेचे असल्याचे यावेळी आवाहन केले. आम्ही निवडुन येवु न येवु निवडणुक होवुन पंचेचाळीस दिवसात तुळजापूर शहरवासियांसाठी शहरात दर्शनाची सोय न केल्यास मी स्वता आंदोलन करणार असल्याचे यावेळी म्हणाले.

 
Top