धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव शहराच्या संगीत क्षेत्रात गेल्या 24 वर्षांपासून दीपावलीत रसिकांना शास्त्रीय संगीताची मेजवानी देणारा वडगावकर परिवाराच्या वतीने ॲड. देविदास व अण्णा वडगावकर यांनी आयोजित केलेला दीपोत्सव एक स्वर पर्व मेघमल्हार सभागृहात रविवार दि. 3 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची व रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

दीपावलीच्या आनंद दीप पर्वात शहरातील व परिसरातील रसिकांनी शास्त्रीय उपशास्त्रीय संगीताची मेजवानी मिळावी. त्या संबंधीची आवड समाजात टिकून राहावी. परस्परातील स्नेहसंबंध द्विगुणित व्हावा. या हेतूने कै. पांडुरंगराव वडगावकर यांनी 24 वर्षांपूर्वी ह्या उपक्रमाचा शुभारंभ केला. तो पुढे त्यांच्यानंतर त्यांची विविध क्षेत्रातील कार्यरत असलेली मुले, मुली, सुना, जावई, नातू व पणतू या सर्वांनी मिळून एकत्र येत ही परंपरा अबाधित ठेवली आहे. त्यासाठी शास्त्रीय संगीतात नावलौकिक मिळवलेल्या मान्यवर कलाकारांना निमंत्रित केले जाते. संगीत क्षेत्रातील उगवता तारा म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते. ज्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारांनी व सन्मानांनी गौरविलेले आहे असे आकाशवाणीचे मान्यता प्राप्त गायक कलावंत अभिजीत आपस्तंभ यांनी हे 24 वे गानपुष्प गुंफले त्यांना संवादिनीची साथ हरीश कुलकर्णी यांनी तबल्याची साथ प्रशांत गाजरे यांनी पखवाजाची साथ विश्वेश्वर कोळंबीकर यांनी तर मंजिरीची साथ अण्णा वडगावकर यांनी केली.

संगीत क्षेत्रात कार्यरत असलेले व धाराशिवच्या भूमीला  नावलौकिक  मिळवून देणारे कलावंत पांडुरंग मुखडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा डॉ. मानसी वडगावकर व डॉ. जानवी किशोर जोशी यांनी पीएचडी केल्याबद्दल त्यांचा ह्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. 


अभिजीत आपस्तंभ यांनी ह्या कार्यक्रमात राग भटियार बोल उजेड गई मोरी नींद, ज्ञानप्रकाश घोबद्रुत आनंद घडी आयो  व मै तो तेरे जपत हु पं. सी आर व्यास यांचे  जा रे जा रे जा कगवा घेई छंद मकरंद व जय शंकरा ही नाट्यगीते सुनता है गुरु ज्ञानी विष्णुमय, जग वैष्णवांचा धर्म ही भजूे, सावळे सुंदर विठ्ठल आवडी प्रेमभाव व कानडा राजा पंढरीचा ही भक्ती गीते सागर करून रसिकांची मने जिंकली. 


वडगावकर परिवार यावेळी उपस्थित होता. प्रा. वैभव कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन सुधीर पवार यांनी केले. आरोही कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले.

 
Top