धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने ऐतिहासिक विजय मिळवत बहुमतात आपले सरकार स्थापन करणार असल्याने व माता-भगिनी व जनतेने दिलेला कौल यांचे आभार मानण्यासाठी शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्याची आतिषबाजी व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच धारासुर मर्दिनी देवीला देखील पुष्पहार अर्पण करून आतिषबाजी करत पेढे वाटप करण्यात आले. यावेळी महायुती सरकारला दिलेल्या मतदानरुपी आशीर्वादाची नक्कीच परतफेड हे महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही अशी शिवसेनेच्या वतीने प्रतिक्रिया देण्यात आली.

शिवउद्योग सेना जिल्हाप्रमुख सुनील शेरखाने, मागासवर्गीय सेलचे अमित बनसोडे शिवसेना शहर संघटक रणजीत चौधरी, युवासेना शहर प्रमुख सागर कदम,अमर माळी,आकाश कोकाटे,अजय नाईकवाडी, प्रवीण पवार,सादिक भाई तांबोळी,पप्पू बागल,दिनेश तुपे, अजिंक्य आगलावे,अविनाश टापरे,अतुल टापरे,आदित्य गवंडी, अमर मडके,सागर माळी, मयूर माळी,कृष्णा घोणे, सुरज राऊत,अक्षय शेंडगे,नागेश थोरबोले,आदित्य थोरात यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top