धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील पाडोळी (आ.) येथील रुपामाता नँचरल शुगर यु.क्र. 1 या कारखान्याच्या 2024-25 हंगामातील पहिल्या पंधरवड्यात गाळपासाठी आलेल्या उसाची बिल र 2500 रुपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अँड. व्यंकटराव गुंड यांनी दिली. उत्पादक शेतकऱ्यांनी रूपामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट साठी शाखेत जाऊन बिल घ्यावे व ज्या शेतकऱ्यांनी अद्याप खाते उघडले नाही त्यांनी त्वरित आपले खाते उघडून घ्यावे असेही अँड. गुंड यांनी सांगितले तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.
रुपामाता नँचरल शुगर युनिट क्र. 3 देवसिंगा (तुळ) ता. तुळजापूर येथील 2024- 25 चा मोळी पूजन करून गळीत हंगामाचा शुभारंभ माऊली उद्योग समूहाचे चेअरमन व्ही.पी.पाटील, बँक ऑफ महाराष्ट्र आनंद नगर शाखेचे मुख्य प्रबंधक राजेश कुशवाह, जि. प. माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड (गुरुजी), हभप. बाबुराव पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी मुख्य पूर्वक अँड.गुंड यांनी म्हणाले की , तुळजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात 'रूपामाता' च्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधणे हेच आमचे लक्ष असल्याचे यावेळी सांगितले. या समारंभास ऊस उत्पादक शेतकरी, दुध ऊत्पादक, ऊस तोड वाहतूक ठेकेदार, उद्योग समुहाचे पदाधिकारी, कारखान्यातील सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.