तुळजापूर (प्रतिनिधी)- 241 तुळजापूर विधानसभा मतदार संघात यंदा  हौशे, नवशे, गवशे उमेदवारांचा सुळसुळाट वाढला आहे. या हौशा नवश्या उमेदवार बाबतीत मतदारांमध्ये वेगळीच चर्चा चविष्टतेने मतदार संघात चर्चिली जात आहे. हे हवशे, नवशे, गवशे उमेदवार  विधानसभा निवडणुक लागले कीच अवतारले आहेत. या पुर्वी पावणेपाच वर्ष कुठे गायब होते.अशी मतदारांमध्ये चर्चा होत आहे. हे लोकशाही सक्षम करण्यासाठी उभारले कि अन्य कारणासाठी उभारले या बाबतीत याचे उतर मतदारांना मिळेनासे झाले आहे.

या हौशे नवशे गवशे उमेदवार कशासाठी उभारले या बाबतीत मतदार जरी अनभिज्ञ असलेले तरी राजकिय वर्तुळात मात्र या उमेदवारांबाबतीत वेगळीच चर्चा होत आहे. यातील काही हौशी, नवशे, गवशे  वैचारीकता नसलेले उमेदवार प्रमुख पक्षांचा उमेदवारांना भेटल्याची चर्चा आहे. मात्र प्रमुख उमेदवारास हे उमेदवार उभे  राहणे सोयीचे असल्याने त्यांनी माघार घेवू नका, उभा राहा असा सल्ला दिल्यानेच ते उभे राहिल्याची चर्चा आहे.

हे हौशी, नवशे, गवशे उमेदवार आपण लढतीत असल्याचा केविलवाणी प्रयत्न अन्य मार्गाने करीत आहेत. पण मतदार मात्र त्यांना हौशे, गवशे, नवशे उमेदवारांना खिजगिणतीत ही मोजत नाहीत. त्यांना अवलिया उमेदवार म्हणून चर्चा करीत आहे. या हौशे, नवशे, गवशे उमेदवारांमुळेच  दोन वोटींग मशीन मतदानसाठी लावाव्या लागल्या व त्यामुळे हे उमेदवार लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी उभारले कि करदात्यांचा पैसा खर्च करण्यासाठी उभारले असा सवाल मतदारांमधुन विचारला जात आहे. मतमोजणी नंतर या उमेदवारांचा पर्दाफार्श होणार आहे.

 
Top