तुळजापूर (प्रतिनिधी)- निवडणूक विभागात कार्यरत लेखाधिकारी श्री कुरणे यांच्यावर आरपी ॲक्ट सेक्शन 134 आणि बीएनएस सेक्शन 223 नुसार आज तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कुरणे यांच्यावर आरोच्या परवानगी शिवाय कार्यालय सोडल्याने निवडणूक आयोगाला रिपोर्ट पाठवण्यासाठी विलंब झाला. (रात्रीचे 1 वाजले) तसेच निवडणूक खर्चाविषयी उमेदवार यांनी माहिती मागितली असता त्यांना योग्य माहिती न देता उडवा उडवी चे उत्तर देणे आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांशी उद्धट वर्तन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्यांना निलंबित करून खर्चाचे नोडल अधिकारी म्हणून वाळूजकर यांचेकडे पदभार देण्यात आला. या कारवाईमुळे यापूर्वी नोटीस दिलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना धडकी भरली आहे.