नळदुर्ग (प्रतिनिधी)- तुळजापुर विधानसभा मतदार संघातील विकासाचा हा ओघ कायम ठेवण्यासाठी येत्या 20 तारखेला कमळ चिन्हावर बटन दाबुन महायुतीला आपल्या गावातुन मोठे मताधिक्य द्यावे. असे आवाहन धाराशिव जि. प. च्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी चिकुंद्रा, मानेवाडी व तुळजापुर येथे बैठका घेऊन नागरीकांशी संवाद साधताना केले.

तुळजापुर विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे या मतदार संघात महायुती, महाविकास आघाडी, समाजवादी पक्ष, वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्ष म्हणुन निवडणुक लढविणाऱ्या सर्वच उमेदवारांनी सध्या आपल्या प्रचाराची गती वाढविली आहे. त्यामुळे या मतदार संघातील राजकीय वातावरण सध्या ढवळुन निघाले आहे. या मतदार संघातील महयुतीचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अतिशय नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवुन प्रचारात आघाडी घेतली आहे. महायुतीचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ धाराशिव जि. प. च्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी चिकुंद्रा, मानेवाडी व तुळजापुर येथे बैठका घेऊन नागरीकांशी संवाद साधला आहे.

यावेळी बोलतांना त्यांनी म्हटले की, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर असुन राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये म्हणजे वर्षाला 25000 रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर तुळजापुर विधानसभा मतदार संघासह संपुर्ण धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता राणाजगजितसिंह पाटील यांच्यामध्ये आहे असे अर्चनाताई पाटील यांनी म्हटले आहे. अर्चनाताई पाटील यांच्या बैठकांना प्रत्येक गांवातुन उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

 
Top