नळदुर्ग (प्रतिनिधी)- शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे. त्यामुळे शिकाल तर जगाल. येणाऱ्या काळात सुखी, संपन्न, समृध्द भारत घडवायचा असेल तर, हिंदु, बौध्द, मुसलमान, जैन, ख्रिश्चन, सिख असा भेद न करता अलग भाषा, अलग बेस फिर भी हमारा देश एक हे तत्व बाळगुन कुठल्याही जातीवादावर, साप्रादायावर विश्वास न ठेवता, सर्वांचा विकास हेच ध्येय असणाऱ्या भाजपा महायुतीच्या मागे खंभीरपणे उभे टाकून भाजपाचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करावे. असे आवाहन केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे बोलताना केले.
तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ नळदुर्ग येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार राणाजगजितसिंह पाटील, सुनिल चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, ॲड. मिलिंद पाटील, नितीन काळे, महेंद्र धूरगुडे, ज्ञानेश्वर घोडके, भाजपचे सुशांत भूमकर, माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, आपण कोणत्याही महापुरुषाच्या, संताच्या जाती विचारत नाही. त्यामुळे कशा करता जातीसाठी माती खाता, हे खरे आहे. आर्थिक व भौतीक मागासलेपण आहे, त्यांना जरुर सवलती मिळाल्या पाहिजेत. या बददल माझे दुमत नाही. हॉटेलात जेवण करताना, डॉक्टर निवडताना आपण जातीचे निवडत नाही मग निवडणुकीत कशाला जातीसाठी माती खायची. जो आपले भविष्य बदलू शकेल, जो आपल्या भागाचा विकास करु शकेल, शेतकऱ्यासाठी पाणी देवू शकेल, जो गावातला रस्ता बनवु शकेल, शेतकऱ्यांच्या मुलाच्या हाताला काम देवू शकेल अशा काम करणाऱ्या भाजपा महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणे आपण उभे टाका.
धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा. चालायला लावणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, आणि थांबालेल्या पाण्याला जमीनीला प्यायला लावा. गावातले पाणी गावात, घरातले पाणी घरात, शेतीतील पाणी शेतीत, जमीनीतले पाणी जमीनीत त्यामुळे या भागातील तलावातील, नदी नाल्यातील खोली करण करुन रस्ते तयार करावे. त्याच बरोबर या जिल्हयातील पाण्याची साठवण क्षमता वाढवा. असे सांगून गेल्या दहा वर्षा मध्ये आपल्या भागामध्ये किती कामे झाली. कारण आपला जर विकास व्हायचा असेल तर दोन् गोष्टी महत्वाचे आहेत. ते म्हणजे उदयोग आणि व्यापार आणि दुसरे शेती या दोन गोष्टीवर काम करावे लागेल. या दोन क्षेत्रात विकास करायचा असेल तर चार गोष्टी महत्वाच्या आहेत. वॉटर, पावर, ट्रॉन्सपोर्ट, कम्युनिकेशन ज्या ठिकाणी या चार गोष्टी विकसीत होतात त्या ठिकाणी उदयोग व्यवसाय येतो. व्यापार वाढतो आणि त्याच ठिकाणी रोजगाराची निर्मीती होते. आपल्या देशाला सुखी आणि समृध्द करायचा असेल तर या देशामधील गरीबी आणि भुकबळी, बेरोजगारी कमी झाली पाहीजे. आपला देश जगातील तिसऱ्या नंबरची आर्थिक शक्ती निर्माण झाली पाहीजे. पाच ट्रीलीयन डॉलरची इकॉनॉमी जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने विश्वगुरु होवू. म्हणून आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर रस्ते चांगले होणे गरजेचे आहे. रस्त्याच्या विकास झाला पाहीजे.
आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास सहा हजार कोटी रुपये रस्त्याच्या कामावर खर्च केले आहेत. मी ज्या वेळेस मंत्री होतो, तेव्हा धाराशिव जिल्हया मध्ये राष्ट्रीय महामार्गाची लांबी ही केवळ 195 किलो मीटर होती. आज मला सांगताना आनंद होतोय की, आज या जिल्हयात राष्ट्रीय महामार्ग जवळपास 418 किलोमीटर आहे. म्हणजे 223 किलो मीटर महामार्गाची लांबी वाढली आहे. या जिल्हयात चोवीस कामे जवळपास सहा हजार कोटीचे कामे मंजूर झाली आहेत. 11 कामे पूर्ण झाली आणि तेरा कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. तुळजापूर विकास आराखडयासाठी दोन हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत असून हे सुंदर तुळजापूर होत असल्याने ही कौतुकाची बाब आहे. बारा हजार कोटी रुपयेचा पालखी मार्ग ही पूर्ण करण्यात आला आहे. असे ते म्हणाले. तुळजापूर मतदार संघात नळदुर्ग ते तुळजापूर या मार्गाचे काम मंजूर झाले असून निवडणुकीनंतर या काम सुरु होईल. नळदुर्ग ते आक्कलकोट राष्ट्रीय महामार्गाचे थांबलेले काम आणि शेतकऱ्यांनी काम आडवल्यामुळे हे काम थांबले आहे. आता या शेतकऱ्यांच्या जमीनीचे पैसे देण्यासाठी 66 कोटी रुपये देण्याची तरतुद करुन लवकरच या रस्त्याचे काम सुरु करण्यात येईल असे या वेळी गडकरी यांनी म्हटले.
त्याच बरोबर ज्यांनी डॉ. बाबासाहेबांचे संविधान तोडल मरुडल त्यांनीच संविधान बचाव म्हणून आव आणणाऱ्या काँग्रेसने लोकांसमोर खोटा प्रचार केला. म्हणजे चोराच्या उलटया बोंबा. त्यामुळे बाबासाहेबांचे संविधान कोणालाही मोडु देणार नाही, बदलू देणार नाही आणि कोणाची बदलण्याची हिम्मत ही नाही. हे आमची गॅरंटी आहे. मुसलमानांनाही सांगितले की, ये भाजपावाले बहोत खतरनाक है, ये चुनके आने के बाद आपको कटवा देंगे, आपको पाकीस्तान भेजेंगे, इसिलिए सुरक्षीत रहना है तो पंजे को चुन के लाव. परंतु भाजपा सरकारने उज्वला गॅस देताना, लाडकी बहीणीचा लाभ, शासकीय योजनेचा लाभ घेताना कधी ही जात धर्म पाहीले नाही. त्यामुळे काँग्रेसने मुसलमानांना काय दिले तर चहा टपरी, पान टपरी, ड्रायव्हर, किल्नर, या शिवाय दुसरे काय दिले. पण मुसलमानां करता मी नागपूर मध्ये इंजिनीअर कॉलेज दिले. जिल्हाधिकारी बना, डॉक्टर बना, आणि आपले करीअर घडवा. ज्ञानाचे भांडार फार मोठे आहे त्यामुळे ज्ञान हे पावर आहे. शिक्षण घ्या आणि शिक्षण घेतले तर जगाल, असे ही त्यांनी यावेळी म्हटले. यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा त्यांनी आपल्या भाषणातुन घेतला.