धाराशिव - दि. २५ ते २९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान अलीगड, उत्तर प्रदेश या ठिकाणी संपन्न झालेल्या 43 वी जूनियर गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या कुमार व मुली अशा दोन्ही संघांनी सुवर्णपदक प्राप्त केले.
या सुवर्णपदक विजेत्या संघामध्ये श्रीपतराव भोसले हायस्कूल चे खेळाडू भरतसिंग वसावे(कर्णधार) ,राज जाधव , जितेंद्र वसावे, सोत्या वळवी, विलास वळवी तर मुली गटात कु सुहानी धोत्रे(कर्णधार) , कु अश्विनी शिंदे, कु तन्वी भोसले, कु प्रणाली काळे यांचा समावेश होता.
देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा वीर अभिमन्यू पुरस्कार जितेंद्र वसावे तर जानकी पुरस्कार कु सुहानी धोत्रे या खेळाडूंना मिळाला आहे. वरील सर्व सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना राष्ट्रीय प्रशिक्षक प्रविण बागल , अभिजीत पाटील , प्रभाकर काळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर आण्णा पाटील , महाराष्ट्र खो खो संघटनेचे सरचिटणीस डॉ चंद्रजित जाधव सर,आ.शि. प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील, कार्यकारी अधिकारी आदित्य भैया पाटील, प्राचार्य नन्नवरे सर सर्व पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.