धाराशिव (प्रतिनिधी) - तालुक्यातील वडगाव (सि) येथे लक्ष्मणशक्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी या लक्ष्मणशक्ती सोहळ्यास प्रारंभ होणार असून 28 नोव्हेंबर रोजी सुर्योदयवेळी आरती व महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.
तालुक्यातील वडगांव (सिद्धेश्वर) नगरीत 30 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्र यांच्यावर आधारित भावार्थ रामायण सलग तीन वर्ष अखंड सुरू ठेवले होते. गावातील सर्व नागरिकांनी धार्मिकरित्या पालन करून. अप्रतिम असा सहभाग घेऊन ते कार्य पूर्ण केले होते. आता पुरत पुन्हा एकदा गुढी पाडवाच्या शुभमुहूर्ताचे औचित्य 24 एप्रिल पासून श्री. प्रभू रामचंद्र यांच्यावर आधारित रामायण पुन्हा सुरू केले आहे. या रामायणातील अतिमहत्वाचा उत्सव लक्ष्मण शक्ती सोहळा 27 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा होत आहे.
27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी या लक्ष्मणशक्ती सोहळ्यास प्रारंभ होणार असून 28 नोव्हेंबर रोजी सुर्योदयवेळी आरती व महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. या धार्मिक कार्यास वडगांव सिद्धेश्वर व परिसरातील भाविक भक्तांनी कुटुंबासह उपस्थित राहुन या कार्याची शोभा वाढवावी असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.