धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळणी येथे आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान अमृत मोहित्सव दिन उत्साहात साजरा करण्यात आला, प्रथम संविधान सुपूर्द करतानाच्या फोटोस पुस्प माला अर्पण करण्यात आली, तसेच संविधानाच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ व संविधाना चे महत्व, भारतातील नागरिकांना संविधान ने दिलेले हक्क, अधिकार व कर्तव्य याविषयीं माहिती मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी संविधानाचे सामूहिक वाचन केले. व 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शाहीत झालेल्या पोलीस अधिकारी व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यानंतर अळणी गावातून संविधान ची माहिती असणारे सबसे प्यारा संविधान हमारा, संविधानाचा सन्मान हाच अमुचा अभिमान, संविधानाची महाणता विविधतेत एकता, लोकशाहीचे देते भान भारतीय संविधान असे अनेक फलक हातात घेऊन, घोषणा देत संविधान रॅली काढण्यात आली,त्यानर दुपार सत्रात संविधान अमृत मोहोत्सवी वर्ष्या निमित्त, गोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. व स्पर्धे मधून प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांक काढून विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले या स्पर्धेत शाळेतील एकूण 110 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती वर्षा डोंगरे, सुनीता कराड, मंजुषा नरवटे, क्रांती मते, सुलक्षणा ढगे, सत्यशीला म्हेत्रे, राधाबाई वीर श्री दिनेश पेठे, उत्तम काळे, दादासाहेब कचरे यांनी परिश्रम घेतले.