धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामधील सेट्रल झोन ज्युदो स्पर्धेसाठी मुलांचा संघ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पाठवण्यात आला होता.बीएस्सी भाग एक मध्ये शिकत असलेला ओंकार सोनटक्के हा विद्यार्थी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सेंट्रल झोन स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळवून विजेता ठरला आहे. त्याची निवड ऑल इंडिया स्पर्धेसाठी झालेली आहे.
याबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख तथा रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ओमकार सोनटक्के या खेळाडूला प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, दत्तात्रय जावळे, प्रा. अजिंक्य रेणके, कैलास लांडगे यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल ओंकार सोनटक्के याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.