धाराशिव (प्रतिनिधी)- दि. 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिवस असुन या दिनाचे औचित्य साधून आणि भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मतदार जनजागरण समिती धाराशिव व भारतीय संविधान अमृतमहोत्सवी समिती धाराशिवच्या वतीने शहरातुन भारतीय संविधान जनजागरण रॅलीचे आयोजन केले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या रॅलीत संविधान रथ, शाळा कॉलेज नर्सिंग कॉलेज, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी सह सामाजिक संस्था,संघटना व शहरवासियांचा सहभाग असुन दरवर्षी प्रमाणे ठिकठिकाणी भारतीय संविधान जनजागरण रॅलीचे स्वागत केले जाणार आहे. भारतीय संविधानाचा गौरव करण्यासाठी आपणही या संविधान जनजागरण रॅलीत सहभागी व्हावे. 

हि रॅली दि.26 नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक 10:30 वाजता जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात होणार आहे. रॅलीचा मार्ग बार्शी नाका जिजाऊ चौक, श्रीपतराव भोसले हायस्कूल,जॉन मलेलु चर्च, लेडीज क्लब,आर्य समाज मंदिर चौक ते अंबाला हॉटेल मार्ग त्रिशरण चौक,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय समोरुन मारवाडी गल्ली,काळा मारुती मंदिर चौक, ताजमहाल टॉकीज रोड, डॉ ए पी जे अब्दुल कलाम चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते विश्वरत्न डा.ॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा आणि शेजारील फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित मोकळ्या जागेत समारोप होईल. तरी आपण सर्वांनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन मतदार जनजागरण समिती धाराशिवचे कार्याध्यक्ष गणेश वाघमारे यांनी समितीच्या वतीने केले आहे.

 
Top