धाराशिव (प्रतिनिधी)- शासनाने सोयाबीन खरेदी करताना ओलावा 12 ऐवजी 15 टक्के वाढ करावा तसेच एक हेक्टरला 12 ऐवजी 19 क्विंटल खरेदी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केली आहे. याबाबत पुणे सहकार व पणनचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांच्याकडे शुक्रवारी (दि.22) निवेदन दिले आहे.
या निवदेनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, मराठवाड्यात खरीपामध्ये सोयाबीन पेरणी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये 90 टक्के सोयाबीनची पेरणी झालेली आहे. शेतकऱ्यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामध्ये सोयाबीन काढलेले आहे. पावसाळ्यामध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झालेले आहे. सोयाबीन मधील आरद्रता (हवा) थंड हवामानामुळे कमी होत नाही. त्यामुळे शासनाने 4892 रुपये प्रती क्विंटलप्रमाणे सोयाबीन खरेदी करत असताना त्यामधील ओलावा (हवा) 12 ऐवजी 15 टक्के वाढ करावी व सोयाबीन खरदी करताना हेक्टरी 12 ऐवजी 19 क्विंटल खरेदी करावी व जिल्ह्यामध्ये अजुन नव्याने दहा खरेदी केंद्र ताबडतोब चालु करावीत. ज्यामुळे शेतकयांना त्यांचे सोयाबीन कमी पैशात विकावे लागणार नाही. तसेच व्यापारी शेतकयांचे सोयाबीन कमी पैशात खरेदी करणार नाहीत व यामुळे शेतकयांचे आर्थीक संकट टळेल. त्यासाठी संबंधीतांना त्वरीत आदेशीत करावे अशी मागणी जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर यांनी केली आहे.