धाराशिव (प्रतिनिधी)-  अनोळखी महिलेच्या खुनाचे गुढ उघड करण्यास धाराशिव पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषन केल्यानंतर चार आरोपींना या प्रकरणी पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली.

गुन्ह्याचा काहीही पुरावा नसताना सदर भागात सीसीटिव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आले. फुटेजमध्ये एक कार दिसून आली. हे वाहन पेढगाव येथे मिळून आल्याने वाहन व चालक यांना ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने संदीप उत्तम तोरणे, वय 34 वर्षे, रा. पेढगाव ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर असे सांगितले. विशेष टिम यांनी त्यास गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली. त्याने सुरुवातीस उडावा उडवीचे उत्तरे दिले. त्यावर त्यास अधिक विश्वासात घेवून  विचारपूस केली असता त्यानी सांगितले की, मयत महिला ही मुळ ब्राम्हणी तालुका श्रीरामपुर येथील असुन  तिचे गावातील विश्वास नामदेव झरे याचे सोबत अनैतिक संबध होते. ती विश्वास झरे यास नेहमी पैशाची मागणी करुन त्रास देत होती. म्हणून विश्वास झरे यांने संदीप तोरणे, सोमनाथ रामनाथ कराळे वय 27 वर्षे, महेश कुंडलीक जाधव वय 19 वर्षे, दोघे रा. ब्राम्हणी ता. राहुरी जि.अहमदनगर असे तिघांना मिळून एकुण 92 हजार रूपये देवून सदर महिलेचा काटा काढून टाका व तिला लांब घेवून जावून मारुन कोठेतरी फेकून द्या असे सांगितले. आम्ही तिघांनी मिळून दि.16.11.2024 रोजी रात्री 21.00 वा. सु. तिस नेवासा फाटा येथुन घेवून तिला सांगितले की, आपल्याला तुळजापूर येथे देवदर्शनासाठी जायचे आहे. तिस स्वीप्ट डिझायर मध्ये घेवून नेवास फाटा-घोडेगाव- अ.नगर- कडा आष्टी- जामखेड- खर्डा- आंबी या मार्गाने सोनारी गावाचे पुढे असलेल्या नदीच्या पुलावर रात्री अंदाजे 03.00 वा सदर महिलेचा गळा आवळला. पण ती मेली नसल्याने तिच्या डोक्यात दगड टाकून जिवे ठार मारले व पुरावा नष्ट करण्याकरीता तिस पुलावरुन पाण्यात टाकले. विशेष टिमने संदीप तोरणे यास ताब्यात घेवून त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे इतर तिघांना वंजारवाडी शिवारातुन सोनाई ता. नेवासा जवळून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या तिघांना गुन्ह्या बाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, संदीप तोरणे यांनी सांगितल्या प्रमाणे गुन्हा केला असल्याची कबुली दिली.


यांनी केला तपास 

सदरची  कामगिरी ही पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, सुदर्शन कासार, पोलीस हावलदार विनोद जानराव, शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, अमोल निंबाळकर, समाधान वाघमारे, फरहान पठाण, पोलीस नाईक  नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड,विनायक दहिहंडे, पोलीस अंमलदार नागनाथ गुरव, सुनिल मोरे यांच्या पथकाने केली आहे.

 
Top