उमरगा (प्रतिनिधी)- मुरूम मोड येथे कार्यकर्ता मेळावा प्रसंगी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उमरगा-लोहारा मतदार संघात अतिशय चांगले काम करून मागील 15 वर्ष मध्ये आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे. चौगुले यांची विकासकामांच्या माध्यमातून जनतेशी नाळ जोडली आहे. मतदारसंघाचा विकास आणखी गतीने होण्यासाठी त्यांना विक्रमी मताधिक्य देऊन विजयी करूया, असे आवाहन माजी मंत्री व भाजप नेते बसवराज पाटील यांनी केले.
शिवसेना महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा मुरूम मोड ,येणेगूर येथे संबोधित करत होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकचे बापुरावजी पाटील, ॲड.विश्वनाथ पत्रिके, उल्हास घुरघुरे, विष्णू पाटील, शिवलिंग माळी, अनिल सगर, बसवराज कारभारी, दीपक मुळे, प्रशांत काळे, योगेश राठोड, हरी लोखंडे, शौकत पटेल, विक्रम मस्के, माजी उपसभापती बुद्धिवंत साखरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना माजी मंत्री बसवराज पाटील यांनी सांगितले की, चौगुले हे शांत, संयमी, सकारात्मक नेतृत्व आहे. राज्यातील अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या 29 मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मताधिक्याने चौगुले निवडून द्यावे असे सांगितले.