उमरगा (प्रतिनिधी)- मागील पंधरा वर्षाच्या आमदारकीच्या माध्यमातून जनतेचा नोकर म्हणून जनतेचे प्रश्न मार्गी लावले आहेत. विकासकामांसाठी सतत पाठपुरावा केला. सर्वांना विश्वासात घेवूनच विकासाची कामे पुर्णत्वास नेली. उमरगा-लोहारा तालुक्यातील जनता माझ्या कामाबद्दल समाधानी आहे. मी त्यांचा विश्वास कमावलाय, त्यामुळे विरोधकांकडे लक्ष देण्याची गरज नाही. विकासाला महायुती कधीही कमी पडणार नाही. आपल्यासोबत सारेजण आहेत. त्यामुळे येत्या 20 तारखेला आपण सर्वांनी 'धनुष्यबाण' या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करुन सेवेची पुनश्च संधी द्यावी असे आवाहन आ. ज्ञानराज चौगुले यांनी केले.
उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ कदेर आयोजित सभेत बोलत होते. यावेळी_प्रा.माजी खासदार रवींद्र गायकवाड, भाजपा तालुकाध्यक्ष शहाजी पाटील, माजी सभापती दिलीप गौतम, सरपंच सतीश जाधव, लहुजी शक्ती सेनेचे राजाभाऊ शिंदे विजय तोरडकर, मधुकरराव पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती मुरूम चे धनराज जाधव, माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश जाधव,बालाजी बनसोडे भरत कलबुर्गे, धोंडीराम गायकवाड विश्वनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार चौगुले यांनी सांगितले की, मधे कायमस्वरूपी पाणी पुरवठा करून नवीन उद्योग व्यवसायाला चालना देवून रोजगार निर्मीती करणार व लोहारा येथे मंजूर करून घेणार. मतदारसंघातील शैक्षणिक संस्था व शासकिय शाळांना शासकिय मदत देवून सर्वांगीण विकास करणार.बेन्नीतुरा नदीचे कर्नाटक राज्यात वाहून जाणारे पाणी आडवण्यासाठी स्वतंत्र उपाययोजना करणार तसेच कोळसुर पाटबंधारे ते तुरोरी मध्यम प्रकल्प जोडकालव्याची दुरूस्ती करून पाणी पुरवठार सुरळीत करून घेणार.
याप्रसंगी माजी सरपंच विश्वनाथ, शिवसेना शाखाध्यक्ष कपिल गायकवाड, शरद भाले, धोंडीराम बनसोडे, नरेश भोसले, डॉक्टर मनोहर, डॉक्टर राम जाधव,विवेक चौधरी, माशुम कमानदार, श्याम चौधरी, कमलाकर चौधरी, भास्कर मानेगोपाळे, कपिल गायकवाड, विवेकानंद चौधरी, महेश कलशेट्टी, प्रसन्नकुमार बिराजदार, विशाल कलबुर्गे, सुभाष चव्हाण,सचिन चव्हाण, सुमित चव्हाण, अनिल चव्हाण, बालाजी राठोड, मयूर चव्हाण, अमित चव्हाण आदींसह गावातील नागरिक व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.