तेर (प्रतिनिधी)-  धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे  कार्तिक सोहळ्यानिमित्त पंढरपूरला प्रस्थान झाले.

तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे युवा नेते मल्हार पाटील व  निरीक्षक अतुल नळणीकर यांच्या हस्ते पालखीचे प्रस्थान झाले.यावेळी हभप रघुनंदन महाराज पुजारी,दिपक महाराज खरात, महेश महाराज भोरे, साहेबराव सौदागर, दत्तात्रय मुळे, पद्माकर फंड,उपसरपंच श्रीमंत फंड, डॉ गुरूप्रसाद चिवटे, अविनाश आगाशे, दत्तात्रय स्वामी, धनंजय पुजारी,प्रशांत वाघ, गोरख माळी,काकासाहेब मगर,विजय डक,संजय जाधव, महादेव खटावकर, नागनाथ कुंभार, नवनाथ पसारे, भारत रोहीदास, संजय इंगळे, नानासाहेब भक्ते,हरी भक्ते, मज्जित मनियार, बालाजी नाईकवाडी व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. पालखी 7 नोव्हेंबरला यावली, 8नोव्हेबरला खैराव, 9नोव्हेबरला अनगर,10 नोव्हेंबरला रोपळे येथे मुक्काम करून 11 नोव्हेंबरला पंढरपूरला जाणार असून कार्तिक सोहळ्यानंतर पालखी 15 नोव्हेंबरला येवती,16 नोव्हेंबरला खंडोबाचीवाडी,17 नोव्हेंबरला कुंभेज,18 नोव्हेंबरला कापसेवाडी,19 नोव्हेंबरला काळेगाव,20 नोव्हेंबरला साकत पिंपरी, 21 नोव्हेंबरला कौडगाव,22नोव्हेबरला सांजा,23 नोव्हेंबरला काजळा गावी मुक्काम करून पालखी 24 नोव्हेंबरला तेर येथे येणार आहे.

 
Top