तेर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने धाराशिव तालुक्यातील तेर येथे रूट मार्च काढण्यात आला. ढोकी पोलिस स्टेशन यांच्या वतीने बीएसएस सुरक्षा दल यांचा तेर येथे रूट मार्च काढण्यात आला.यावेळी बीएसएफचे कर्मचारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे, पोलिस उपनिरीक्षक सुहास गवळी,तेर दुरक्षेत्रचे बिट अंमलदार प्रदिप मुरळीकर व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.