धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान जनजागरण रॅलीतील सहभागी विद्यार्थी, नागरिक यांना युनिक बहुउद्देशीय सामाजिक सेवा भावी संस्थेच्या वतीने फळे वाटप करण्यात आली, मतदार जनजागरण समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संविधान जनजागरण रॅली काढण्यात आली. दरवर्षी युनिक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद भालेराव हे गेल्या चार वर्षांपासून दि.26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त मतदार जनजागरण समितीच्या वतीने आयोजित संविधान रॅलीत सहभागी होऊन फळे व पाण्याची सोय करतात.
रॅलीचा समारोप संविधान निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित मोकळ्या जागेत केला. याठिकाणी आनंद भालेराव युनिक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबवितात.अशी माहिती समितीचे गणेश वाघमारे यांनी दिली,यावेळी अध्यक्ष आनंद भालेराव व त्यांचे सहकारी सह इतर उपस्थित असतात. या ही वर्षी या कार्याबद्दल मतदार जनजागरण समितीच्या वतीने आशाताई कांबळे,माया पानसे,अमर आगळे यांच्या हस्ते संविधान उद्देशिका व विश्लेषण पत्रक देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी अब्दुल लतिफ, साहित्यिक युवराज नळे, दलित मित्र पुरस्कार विजय गायकवाड, बाबासाहेब गुळीग, सचीन चौधरी, विशाल घरबुडवे श्रीकांत गायकवाड, ज्योती जगताप, समाज कल्याण विभागाचे कपिल थोरात सह इतर उपस्थित होते. समितीच्या वतीने एम. डी. देशमुख यांनी आभार मानले.