धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यातील 7 पोलिस ठाण्याच्या पथकाने 9 दारू अड्ड्यावर छापे मारले. नमूद ठिकाणाहून तब्बल 1 लाख 11 हजार 700 रूपयांचे मद्य जप्त करण्यात आले आहे. शिवाय 9 जणांविरूध्द संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याविरूध्द कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे विविध पोलिस ठाण्याचे पथकांनी दारू अड्ड्यावर कारवायांचा सपाटा लावला आहे. रविवारी लोहारा पोलिसांनी भातागळी व लोहारा बु. येथील दारू अडड्यावर अचानक छापा टाकून मद्य जप्त केले. ढोकी पोलिस ठाण्याच्या पथकाने दुधगाव येथील दोन दारू अडड्यावर छापे टाकले. मुरूम पोलिसांनी कडदोरा व आष्टाकासार लमान तांडा येथील प्रत्येकी एक एक दारू अड्ड्यांवर छापा टाकला.  तुळजापूर पोलिसांनी देवसिंगा तुळ येथील दारू अड्ड्यावर छापा मारला. कळंब पोलिसांनी कळं शहरात व परंडा पोलिसांनी परंड्यातील दारू अडड्यांवर छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी 1 हजार 700 लिटर गावठी दारू निर्मितीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव, दारू व सिंधी, ताडी 279 लिटर, गावठी दारू व सिंधी, ताडी अंमली द्रव 158 असे एकूण 1 लाख 11 हजार 700 रूपये किंमतीचे मद्य जप्त करण्यात आले आहे. 


 
Top