धाराशिव (प्रतिनिधी)- पोलिसांनी नळदुर्ग येथील एका घरावर अचानक छापा टाकून राज्यात प्रतिबंधित असलेला 3 लाख 65 हजार 360 रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई नळदुर्ग पोलिसांनी केली. या प्रकरणी एकाविरूध्द गुन्हाही नोंदविण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यात गुटखा निर्मिती व विक्रीस प्रतिबंध आहे. असे असतानाही नळदुर्ग येथील महंमदपनाह गल्लीत एक व्यक्ती गुटखा विक्रीसाठी जवळ बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे नळदुर्ग पोलिसांनी गुरूवारी नमुद ठिकाणी छापा मारला. त्या ठिकाणी मोसीन फयुमोद्दीन जमादार याच्याजवळ 3 लाख 65 हजार 360 रूपये किंमतीचा सुगंधित पान मसाला, गुटखा आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून गुटखा जप्त करून त्याच्याविरूध्द नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक यांचे वाचक- सहाय्यक पोलीस निरीक्षक हिगोंले, पोलीस हावलदार भोजगुडे, पोलीस नाईक शेख, पोलीस अमंलदार उंबरे, जाधव, जाधवर, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक सोळुंके, खलील शेख यांचे पथकाने केली आहे.