तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर विधानसभेत महाविकास आघाडीत अनुभवी,कार्यकर्त्याबरोबर तरूण तडफदार युवा कार्यकर्त्यांच्या हातात प्रचाराची सर्व सुत्रे. तन मनाने,जिव ओतुन प्रचार कार्य करण्यास तत्पर. गल्लोगल्लीतील प्रत्येक मतदाराला भेटुन अँड. कुलदिप उर्फ धिरज पाटील यांचा प्रचार करत. तुळजापूर विधानसभेचा तयार केलेला तालुका जाहीरनामा पत्रिकेचे वाटप चालू आहे.
तुळजापूर सह धाराशिव, नळदुर्ग, तामलवाडी, काटी, आरळी, अणदूर मंगरूळ, कांक्रबा, तेर, केशेगाव, नंदगाव, बारूळ सह ईतरही अनेक ठिकाणी प्रचार कार्यालये उघडून कार्यकर्ते व पदाधिकारी जोराचा प्रचार चालू केला आहे. तसेच गोपीचंद पडकर यांनी लिंगायत समाजास अपशब्द बोलून समाजाचा अपमान केला आहे. म्हणून तुळजापूर राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे तालुका अध्यक्ष धैर्यशील नंदकुमार पाटील यांनी राज्यपालांना एक निवेदन देऊन त्याची विधानपरिषद आमदारकी रद्द करावी असे निवेदन दिले आहे.
तसेच महाविकास आघाडीच्या महिला ब्रिगेडही डॉक्टर शुभांगीताई पाटील, शामलताई वडणे, शुभांगी ताई राजुरकर, शोभाताई शिंदे, सुरेखाताई मुळे, प्रतिभा पाटील, अंजली पाटील, वंदना पाटील, माधुरी पाटील, स्वाती पाटील, सई पाटील,उर्मिला जाधव,वनिता पाटील, हर्षदा पाटील, अंजली कुतवळ, नीलम पाटील, दिपाली पाटील, गायत्री भोसले,उर्मिला जाधव, श्रद्धा पाटील,सोनाली पाटील, रेवती पाटील, दीक्षा पाटील, करुणा पाटील, प्रिया पाटील, वैशाली पाटील, स्वाती सुपनार अशा महिला ब्रिगेड सह गावतील बचत गटाच्या महिलाही उत्साहाने प्रचार करत आहेत. अँड.धिरज पाटील यांनी वरूडा, मुळेगाव, किणी, बावी, तुगाव रूईढोक, गडदेवधरी, शेकापूर, देवळाली, मेंडसिंगा, रूईभर, बरमगाव, आंबेगाव, गौडगाव, महाळंगी ईत्यादी गाव भेट दोरे करून जोरदार प्रचार केला. तसेच मानवी हक्क अभियान सलग्न न्यु भारतीय टायगर सेनेने अँड. धिरज पाटील यांना जाहीर पांठीबा दिला आहे.