धाराशिव (प्रतिनिधी)-  स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने निगडी पुणे येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रोलर व इनलाईन हॉकी स्पर्धा आणि निवड चाचणी स्पर्धेतून धाराशिव जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे खेळाडू प्रथमेश शिंदे, प्रणव पाटील, संघरत्न नगदे अरफिया पटेल आणि रुही चौरे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. 

भारतीय रोलर स्केटिंग महासंघ यांच्या अधिपत्याखाली तमिळनाडू राज्य रोलर स्केटिंग संघटनेच्या वतीने कोयमतुर येथे 5 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय रोलर हॉकी आणि इनलाईन हॉकी घेण्यात येणार आहेत. सदरील स्पर्धेसाठी इनलाईन हॉकी प्रकारात सब ज्युनियर मुलांच्या वयोगटातून प्रणव पाटील व संघरत्न नगदे यांची तर ज्युनियर वयोगटातून प्रथमेश शिंदे तसेच रोलर हॉकी प्रकारात मुलींच्या कॅडेट वयोगटात रुही चौरे आणि सब ज्युनिअर वयोगटात आरफिया पटेल यांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

दरम्यान राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल प्रथमेश, प्रणव, धम्मरत्न,आरफिया व रुही यांचा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी  तहसीलदार सचिन पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक शुभांगी दळवी, अभियंता सुभाष नगदे, धाराशिव जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, सहसचिव निशांत होनमुटे, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, प्रतापसिंह राठोड, कैलास लांडगे, यशोदीप कदम आदींसह खेळाडू, पालक व क्रीडाप्रेमींची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top