धाराशिव (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणूक- 2024 कार्यक्रम निश्चित केल्याने आदर्श आचारसंहिता 15 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली आहे.आदर्श आचारसंहिता कालावधीत अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,धाराशिव कार्यालयाच्या अधिपत्याखालील सर्व अधिकाऱ्यांकडून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री इत्यादीवर पूर्ण प्रतिबंध करण्याकरिता कठोर कारवाई करण्यात येत आहे.
राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली 4 नोव्हेंबर रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तुळजापूर व अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांनी नळदुर्ग चौक,नळदुर्ग ता.तुळजापूर व एकुरगा ता.उमरगा या ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये एकूण 2 गुन्हयांची नोंद करून 2 आरोपीला अटक केली आहे.
या कारवाईमध्ये चार चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. कारवाईमध्ये 100 ब.लिटर हातभट्टी व 9 ब.लि.देशी दारु अंदाजित किंमत 3 लाख 63 हजार 360 रुपयांची जप्त करुन नष्ट केली आहे.
निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भूम विभाग व अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांनी उळुप ता.भुम या ठिकाणी छापा टाकून 1 गुन्हा नोंद करुन 8.64 लि.देशी दारु ( अंदाजे किंमत रु.3360/-) जप्त करुन नष्ट करून आरोपीस अटक केली आहे.निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक विभाग,धाराशिव व अधिनस्त कर्मचारी यांनी खडकी तांडा.ता.तुळजापूर व बेगडा ता. धाराशिव येथील हॉटेल शिवराज धाबा या ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये एकूण 2 गुन्हयांची नोंद करून एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमध्ये 4.32 ब.लि . देशी मद्य,3.06 विदेशी मद्य व हातभट्टी दारु व हातभट्टी दारु निर्मिती करता वापरण्यात येणारे 3200 लि . रसायन ( एकूण अंदाजित किंमत 1 लक्ष 38 हजार 85 रुपये ) जप्त करुन नष्ट केले आहे. अशाप्रकारे 4 नोव्हेंबर रोजी या विभागातील अधिकारी यांनी केलेल्या कारवायामध्ये एकूण 5 गुन्हे नोंद करुन हातभटी दारु निर्मिती करता वापरण्यात येणारे 3200 लि . रसायन,100 लि.हातभट्टी दारु, 21.96 लि.देशी दारु,3.06 विदेशी दारु जप्त करण्यात येऊन नष्ट केली. याची अंदाजित किंमत 5 लक्ष 4 ,हजार 805 रुपये इतकी आहे . तसेच या कारवायामध्ये एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.