धाराशिव  (प्रतिनिधी)-  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने मतदान क्षेत्रात मतदार असलेले उद्योगातील कामगार / अधिकारी/ कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याबाबत उद्योग विभागातंर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांना कळविले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान केंद्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देण्यात यावी. मात्र त्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.


 
Top