धाराशिव (प्रतिनिधी)- येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.या दिवशी मतदारांना निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच मतदान शांततेत पार पडावे यासाठी जिल्ह्यातील ज्या गावी आठवणी बाजार भरतात ते बंद ठेवण्याचे किंवा पुढे ढकलण्याचे वा अन्य दिवशी भरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिले आहे.
जिल्ह्यातील धाराशिव तालुका - सारोळा (बु) व टाकडी बेंबळी , तुळजापूर तालुका - नंदगाव, उमरगा तालुका - डिग्गी व कोराळ, लोहारा तालुका - सास्तुर व आष्टा परांडा तालुका - शेळगाव व जवळा (नि),कळंब तालुका - येरमाळा व खामसवाडी येथे बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांनी दिले आहे.