धाराशिव  - शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील हॉट मिक्स रस्ता व सीसी नाली कामांचा शुभारंभ आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते व शिवसेना धाराशिव शहर संघटक प्रशांत साळुंके यांच्या उपस्थितीत ७८ लाख ७६ हजार ९३० रुपयांच्या कामांचा शुभारंभ दि.१५ ऑक्टोबर करण्यात आला.


धाराशिव शहरातील प्रभाग ५ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत विकास कामे करणे, राजगृह निवास ते सारनाथ चौक हॉट मिक्स रस्ता व सीसी नाली करणे आदी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी धाराशिव शहर प्रमुख सोमनाथ गुरव, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, एच एम देवकते, चंद्रकांत गायकवाड, महेश लिमये, विकास जाधव, मधुकर जाधव, शिंदे, असिफ तांबोळी, रफिक काझी, यादव, तुरुप, शिंदे, महेंद्र शिंदे, नाना घाटगे, मनोज पडवळ, सुरवसे, गळाकाटे, जाधव गायकवाड, जगताप, दत्ता सोकांडे, सुरेश जाधव, लिंबा शिंदे आदींसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top