भूम (प्रतिनिधी)- निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जाहीर केल्याने 243 परंडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रे व मतदारसंघातील आवश्यक असणारे विषयावरती उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी माहिती सांगितली.
परंडा मतदारसंघात एकूण 376 मतदान केंद्र आहेत .मतदार संघात एकूण 329603 मतदार असून त्यापैकी पुरुष 174761 तर स्त्री 154836 इतर 6 सर्व्हिस मतदार ( सैनिक मतदार) 776 आहेत. तिन्ही तालुक्यातील मिळून 85 वर्ष वयापेक्षा जास्त वय असणारे 6660 मतदार आहेत पीडब्ल्यूडी मतदार 3725 मतदार आहेत. एस एस टी पथके 10 भूम तालुक्यात असुन ईट जातेगाव रोड ईट,नळी वडगाव फाटा,माणकेश्वर, भांडगाव, वाशी तालुक्यात पारगाव चौसाळा रोड,तेरखेडा,कळब मांडवा रोड,मांडवा परंडा तालुक्यात आनाळा, वारदवाडी,लोहारा , रोसा या ठिकाणी असणार आहेत .एफ एस टी पदके पोलीस स्टेशन निहाय असणारा असून भूम 4,आंबी 2,परंडा 2,वाशी 2 राखीव 6पथके राहणार आहेत . निवडणूक काळातील आचारसंहिते बाबत व विविध विषयावर उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांनी सांगितले .यावेळी तहसीलदार जयवंत पाटील,अश्विन कुमार कांबळे व तहसील मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.