तुळजापूर (प्रतिनिधी) - विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय ढवळे सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार अरविंद बोळंगे यांनी पञकार परिषद घेऊन दिली.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डाँ निलेश देशमुख उपस्थित होते. यावेळी 241 तुळजापूर विधानसभा मतदार संघ निवडणूक बाबतीत माहीती देताना म्हणाले कि, या मतदार संघात ऐकुण 410मतदान केंद्र आहेत. ही मतदान प्रक्रिया सवा महिना चालणार असुन शासकीय सुट्टी दिनी कामकाज बंद असणार आहे.
मतदार संघात पुरुष 2,00106, स्त्री 1,80,694 व इतर 6 असे एकुण 380806 मतदार आहेत. एकूण 195 गावे असुन यासाठी 410 मतदान केंद्र असुन यात पुरुष 200104 तर स्ञी 180694 व इतर 6 असे एकुण 380806 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उमेदवारची सर्व माहीती बेवसाईट वर प्रसिद्धी केली जाणार असुन गुन्हयांची माहीती मतदारांसमोर जाहीर करावी लागणार आहे.