तुळजापूर (प्रतिनिधी) - श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवातील तिसरा माळे दिनी शनिवारी (दि.5) रोजी देवीदर्शनार्थ भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
आजही मंदीर परिसरात आकर्षक अशी फुलांचा आरास करण्यात आला होता. शनिवार पहाटे 1 वाजता चरणतिर्थ होवुन धर्म दर्शनार्थ प्रारंभ झाला. सकाळी सहा वाजता देविजीस भाविकांचे अभिषेक प्रारंभ झाला. ते संपल्यानंतर देविजीस वस्ञोलंकार घालुन नित्योपचार पुजा करण्यात आली. आज दिवसभर धर्म दर्शन, मुख दर्शन, अभिषेक, पेड दर्शन रांगा भाविकांनी भरल्या होत्या. सांयकाळी सात वाजता देविजीस दहीदुध, पंचामृत अभिषेक पुजा करण्यात आल्यानंतर देविजीस वस्ञोलंकार घालण्यात आले. नंतर आरती करण्यात आल्यानंतर मंदीर प्रांगणात छबिना काढण्यात आला. नंतर महंत तुकोजीबुवा यांनी प्रक्षाळ पुजा केल्यानंतर नवराञोत्सवातील तिसऱ्या माळेच्या धार्मिक विधीची सांगता झाली.