धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत असताना आज भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील यांना अवमानकारक बोलून बेताल वक्तव्य केले. याच्या निषेधार्थ धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहर काँग्रेसच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी सतत बेताल वक्तव्य करणाऱ्या आ.राणा पाटील यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

या आंदोलनात मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष प्रशांत काका पाटील, तालुकाध्यक्ष विनोद वीर, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, प्रा.वसंत मडके, प्रभाकर लोंढे, अभिमान पेठे, युवक जिल्हा उपाध्यक्ष धवलसिंह लावंड, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्नील शिंगाडे, युवा नेते सलमान शेख, Adv.गणपती कांबळे, Adv.राजूदास आडे, महादेव पेठे, संजय देशमुख, सुनील बडूरकर, संजय गजधने, आरेफ मुलाणी, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रेमानंद सपकाळ, युवक सचिव सौरभ गायकवाड, हरीश जाधव, जुबेर शेख, महादेव पेठे, हज्जू शेख सहभागी होते.

 
Top