धाराशिव (प्रतिनिधी)- विभागीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धा दिनांक 24/10/2024 रोजी पोलीस ग्राउंड बाभळगाव लातूर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये एकलव्य आश्रम शाळा मंगरूळ यमगरवाडी तालुका तुळजापूर येथील विद्यार्थ्यांनी 17 वर्ष वयोगट मुलींमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. अक्षरा पवार, वर्षा वीर, सृष्टी कोळी, प्रतीक्षा काळे, काजल राठोड, अशा मोहिते, प्राची पाटोळे, धनश्री पवार, धनश्री जाधव, जानकी कडेम, शिवानी जाधव, आदिती सुपलकर व 17 वर्ष वयोगट मुलांमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. सुमित माडेवार, अमित माडेवार, ज्योतिराम पवार, सार्थक क्षीरसागर, करण पवार, स्वानंद कोल्हटकर, म्हाळाप्पा मंटगे, बंडगर स्वप्नील, अमर जाधव, आदर्श पाचपुते, शैलेश शिंदे, ज्ञानराज चव्हाण, आकाश पवार या सर्व विजयी खेळाडूंचे व क्रीडा विभाग प्रमुख व क्रीडा प्रशिक्षक ज्ञानेश्वर भुतेकर, बालाजी क्षीरसागर यांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष उद्धव काळे, कार्यवाह, विवेकअयाचीत, उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर, मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर, विठ्ठल म्हेत्रे, संस्थेचे संचालक मंडळ व क्रीडा समितीचे सर्व सदस्य व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.