भूम (प्रतिनिधी)-राज्यातील भाजप - सेना सरकार नागरिकांसाठी फलदायी ठरले आहे. विविध योजनांचा एक प्रकारे पाऊस पडला आहे . पुन्हा एकदा भरघोस योजना ग्रामीण भागात राबवल्या जाव्यात यासाठी भाजप- राष्ट्रवादी - शिवसेना महायुतीच्या सरकारला परत एकदा संधी द्यावी असे आवाहन परंडा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी बोलताना केले.
सोमवार दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी भारतीय जनता पार्टीच्या असंख्य पदाधिकारी - कार्यकर्त्यांना पक्षांतर्गत संघटनात्मक पदोन्नती देण्यात आली . या निमित्ताने त्यांचा पक्ष कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी विधानसभा निवडणुकीतील भाजप पक्षाची महत्त्वाची भूमिका सांगितली . या मतदार संघांत जागा वाटपामध्ये शिवसेना शिंदे गटाला जागा मिळाली असली तरी राज्यात भाजप - सेना - राष्ट्रवादीचे सरकार पुन्हा एकदा आणण्यासाठी तेवढ्याच तळमळीने प्रत्येकाने काम करावे असे आवाहन परंडा विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले.
यावेळी भाजप ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी शरद चोरमले, युवक चिटणीस म्हणून भाऊसाहेब कुटे, चिटणीस म्हणून सुहास सानप, सचिवपदी प्रशांत मोहिते तर युवा भूम तालुका उपाध्यक्षपदी अमित पाटील आंभी, अमोल लोंढे भूम युवा उपाध्यक्षपदी, तर संदीप महानवर यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.
भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूम परंडा वाशी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परंडा विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी असलेले बाळासाहेब क्षिरसागर यांच्यावर विधानसभा महायुतीच्या भाजप समन्वयक पदी जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या समवेत शिंदे शिवसेनेचे दत्तात्रय साळुंखे तर अजित पवार राष्ट्रवादीचे नवनाथ जगताप यांचा सहभाग असणार आहे या निवडीच्या निमित्ताने क्षीरसागर यांचाही भूम तालुक्याच्यावतीने सत्कार केला.
कार्यक्रमासाठी भाजप तालुका अध्यक्ष महादेव वडेकर जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील,
शहर अध्यक्ष बाबासहेब वीर, ता. प्रसिधी प्रमुख शंकर खामकर, वाशी ता. सरचिटणीस सुधिर घोलप, युवक ता. अध्यक्ष गणेश भोगिल, अ जा ता अध्यक्ष प्रदिप साठे. महिला जिल्हा उपाध्यक्ष लताताई गोरे, मुकुंद वाघमारे, सुग्रीव शिंद, आध्यात्मिक आघाडीचे तालुका अध्यक्ष योगेश आसलकरसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.