धाराशिव  (प्रतिनिधी)-  शहरातील नेहरु चौक येथील माऊली चौक ते चौधरी दुकानापर्यंतच्या अतिक्रमणाने  नागरिकांची खुप गैरसोय होत आहे. या भागात छोटे मोठे व्यापारी दुकाने असुन जुनी बाजारपेठ म्हणुन ओळखली जाते. मध्यंतरी सतत होणाऱ्या अपघात पासुन संरक्षण म्हणुन लोखंडी पाईपचे संरक्षण कठडे लावले आहेत. याच लोखंडी पाईपच्या संरक्षक कठड्याला अतिक्रमणाने विळखा घातला आहे. तरी हे अतिक्रमण काढावे अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

या अतिक्रमणामुळे तिथेच खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची वाहने लावल्यामुळे रस्ता छोटा होतो व यापासुन परत अपघात होत आहेत. त्यातच मसाला दुकानासमोरुन येतांना मोटार गाड्या पायवाट असलेल्या वाटेतुन रहदारी करतात अशात महिला भगिनीस धक्का बसला जातो व तक्रारी वाढतात, यासाठी येथील अतिक्रमण काढणे गरजेचे आहे.माऊली चौक ते चौधरी दुकानापर्यंतचे सर्व अतिक्रमण काढुन रस्ता मोकळा करुन द्यावा व आम्हा व्यापाऱ्यांची व येथील आम्हा रहिवाशांना होणा-या गैरसोयी पासुन न्याय द्यावा अशी मागणी लेखी निवेदनातुन नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांच्याकडे केली असुन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना एक प्रत देण्यात आली आहे. निवेदनावर प्रशांत अंबुरे, गणेश वाघमारे, किरण कठारे,अमोल कठारे, रुपेश कठारे, माऊली मेडिकल, नितिन अंधारे, बॉम्बे ग्लास सेंटर, शैलेश कपाळे, न्यु शंकर ड्रेसेस, एस. एम. मुसळे, एम. एस. गार्डे, गणेश गार्डे, देविचंद वॉच सेंटर, अमित जगधने, सतिश अंबुरे, चेतन गोवर्धन सह इतरांच्या सह्या आहेत.

 
Top