तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवात व्हिआयपी भाविकांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे सात ते आठ तास रांगेत थांबणा-या सर्वसामान्य वर्गातील भाविकांना देविचे दर्शन घडत नसल्याने देवी व्हीआयपीची की सर्वसामान्य भाविकांची आहे असा ञस्त सवाल रांगेतुन दर्शन न घडलेल्या भाविकांमधुन केला जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवर मुदत संपत येणार असल्याने आचारसंहिता लागण्या आधी लोकप्रतिनिधी मोठ्या संखेने सहकुंटुंब  देवीदर्शनार्थ येत आहेत. या व्हिआयपी लोकप्रतिनिधीचा प्रोटोकाँल पाळणे, त्यांना दर्शन घडवणे, यासाठी मंदीर प्रशासनाला नाके नऊ येत आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीला थोडासा जरी ञास झाला तर प्रोटोकाँल पुढे करीत प्रशासनातील अधिकारी वर्गास धारेवर धरत आहे. दोन लाख भाविक दाखल असताना थोडी गैरसोय होणारच पण ते या व भाविक लेकराबाळा सह सहा-सात तास रांगेत थांबत आहे. त्याची दखल माञ या मंडळी ना घेवू वाटत नाही. एकदंरीत लोकशाहीत मतदारांना राजा म्हटले जाते त्या उत्सवापुर्वीच त्या राजाला तु प्रजा आहे हे दाखवून देत आहेत.

एका व्हीआयपी बरोबर किती कार्यकर्ता असावे याचा काही नियम नसल्याने व्हीआयपी दर्शनार्थ आला की त्या काळात गाभाऱ्यात आलेल्या भाविकांना देवीदर्शन न घडता त्यांच्या पाठीचे दर्शन घडत असल्याने देवीदारी व्हीआयपी, गरीब हा भेदभाव कधी कमी होणार असा सवाल सर्वसामान्य भाविकांमधुन केला जात आहे.


 
Top