उमरगा (प्रतिनिधी)- शासनाच्या वतीने तहसिल कार्यालय, मार्फत राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृध्दापकाळ, विधवा व इतर योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवार दि.11 रोजी अंतुबळी पतंगे सभागृह उमरगा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या 229, संजय गांधी विधवा अनुदान योजना 138, संजय गांधी दिव्यांग अनुदान योजनेतुन 151, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना 75, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना 03, इंदिरा गांधी नाराष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना 188 असे एकुण 784 लाभार्थ्यांना मंजुरी आदेशाचे वाटप यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास युवा सेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड, तहसिलदार गोविंद येरमे, शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, नायब तहसिलदार रतन काजळे, नायब तहसिलदार बी.व्ही.बोरूळे, युवा सेना तालुकाप्रमुख विनोद कोराळे, शिवसेना उप.ता.प्र. व्यंकट पाटील, चंद्रशेखर पाटील, माजी नगरसेवक पंढरीनाथ कोणे आदी उपस्थित होते.