तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवात जिल्हाअधिकारी डाँ सचिन ओम्बासे यांच्या संकल्पनेतुन हाडको आठवडा परिसरात नव्याने मागील तीन वर्षा पासुन वाहन तळ केल्याने नवराञोत्सवात देवीदर्शनार्थ येणाऱ्या भाविकांची पायपीठ थांबल्याने भाविक जिल्हाधिकारी डाँ सचिन ओम्बासे यांना धन्यवाद देत आहे.
यापुर्वी धाराशिव रोडवर आपसिंगा रोड अग्नीशमन वाहन केंद्र येथे वाहन तळ तयार केले जात तेथुन मंदिरात येण्यासाठी भाविकांना एक ते दीड किलोमीटर पायपीठ करावी लागत असे. तसेच या वाहनतळामुळे धाराशिव रोडवर कायम वाहतुक कोंडी होत असे. तिथे काही दलाल वाहनचालकाकडुन पैसे घेवुन त्या भाविकांची वाहनततळे चिरीमिरी देवुन आठवडा बाजार हाडको मैदानात आणुन लावत. या भाविकांची लुट होत असे माञ जिल्हाधिकारी ओम्बासे यांनी आठवडा बाजार हाडको मैदान वाहनतळ निर्मिती केली. येथुन श्रीतुळजाभवानी मंदीर पायी चालत गेले तरी अवघे पंधरा मिनीटे अंतरावर येते. या वाहनतळामुळे नवराञोत्सवात महामार्ग शहरात होणारी वाहतुक कोंडी बंद होवुन त्याचा लाभ भाविकांना होत आहे.