धाराशिव (प्रतिनिधी)- एवढी अफाट आपुलकी आणि निरपेक्ष प्रेम वाट्याला येणे हे खरं तर आपले भाग्य आहे. आपल्या सर्वांच्या स्नेहाने आणि मायेने पुरता भारावून गेलो आहे. मागील अडीच वर्षाच्या कालावधीत आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आपण सर्वांनी मिळून भविष्याचा अचूक वेध घेतला आहे. जिल्ह्याचा कायापालट होईल अशा अनेक प्रकल्प आणि योजनांना मोठी गती मिळाली आहे. पुढील काळातही यापेक्षाही मोठी झेप आपल्याला घ्यावयाची आहे. आई-वडिलांची शिकवण, कुटुंबियांची साथ, आपल्या सर्वांची उत्स्फूर्त सोबत आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद नेहमीच आपल्याला मोठे पाठबळ देत आले आहेत. आपल्या निरपेक्ष प्रेमाने आणि आपुलकीने खरंच भारावून गेलो आहे. असे सांगत आपल्या मनातील भावना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

संतश्रेष्ठ गोरोबाकाका आणि कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेची सेवा करण्याचे भाग्य सर्वांनाच मिळत नाही. अत्यंत मनोभावे आपल्या सर्वांच्या अपेक्षा, सूचनांचा मोठ्या आदराने विचार करून भविष्यातील अनेक बाबींची आखणी केली आहे. वाढदिवसाच्या दिवशी पुन्हा हाच संकल्प आपल्या सर्वांच्या साक्षीने सोडतो आपल्या जिल्ह्याचा कायापालट हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आणखी वेगाने काम करणार आहे. आज जन्मदिवसाचे औचित्य साधून आपण सर्वांनी व्यक्त केलेला विश्वास आणि शुभेच्छारुपी आशीर्वाद म्हणजे महाविजयचा स्पष्ट संकेत आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आणखी ताकदीने काम करू या..! आपले धन्यवाद मानण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या स्नेहपूर्वक ऋणात राहणेच मी पसंत करिन असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले आहेत.

 
Top